• Pravin Chalak

Corona and distrust 🙄 - कोरोना आणि शंका

कोरोना रुपी वादळ साऱ्या जगावर घोंगाऊ लागलं आणि कोरोनाच्या उत्पती पासून ते विनाशा करिता उपचारापर्यंत सर्व सोशल मीडिया वर उहापोह चालू झाला तो इतका कि मोबाईल तुडुंब भरून वाहू लागले. कोण काय सांगतो, कोण काय लिहितो, हे डिलीट करू का ते सेव्ह करू हे बापड्या मनाला कळेनास झालं. परंतु मी आता यावर चर्चा करणारच नाही कोरोना हा प्राण घातक विषाणू आहे. त्यावर उपचार शोधले जातील किंवा नाही यावर आताच आपण कितीही चर्चा केली तरी फायदा नाही, ते काळ ठरवील परंतु कोरोनाने एक गोष्ट तुमच्या आमच्या मनात निर्माण केली ती म्हणजे शंका हि भीती पोटी निर्माण झालेली शंका आहे.


काल पर्यंत मी सहज आपल्या शेजाऱ्याकडे जात होतो, तो माझ्या कडे येत होता गप्पा टप्पा होत होत्या, चहा पाणी बिनदिक्कत होत होतं, पण आज मी शेजाऱ्याची बेल वाजवायला धजावत नाही. कोण जाणे त्या बेलवर कोरोना महाराज ठाण मांडून बसलेले असतील व नकळत आपला ताबा घेतील. समजा मी धाडस करून बेल वाजवली तरी अर्धवट दरवाजा उघडणारा मित्र (पूर्वी जो दारातच मिठी मारायचा )दोन फूट मागे जाऊन विचारेल काय हवंय? हे का झालं शंकेमुळेच ना?


बेल वाजवणाऱ्याला बेलला बोट लावण्या पूर्वी शंका तर दरवाजा उघडणाऱ्याला येणारा कोरोना घेऊन तर आला नसेल ना याबद्दल शंका. एरवी बेल वाजवून, आत जाऊन, टाळ्या झोडून, चहाबिहा घेऊन बाहेर आलो असतो परंतु आज ते होणार नाही. कारण कोरोनाची शंका. मी काल मेडिकल स्टोअर्स मध्ये गेलो होतो. आम्ही सर्व सामाजिक अंतर ( social distancing ) राखून उभे होतो. आमच्या रांगेतील एकाला शिंक आली. अहो माझ्यासकट रांगेतले सगळे पाच पाच फूट लांब सरकलो नव्हे पळालो. आणि मग आम्ही त्या सद्गृहस्थाला ( जाऊ द्या हि ब्याद पहिली या भावनेने ) पहिला नंबर दिला, का तर कोरोनाची भीती युक्त शंका. मी पेश्याने डॉक्टर आहे. माझा सगळ्या रुग्णाबरोबर संबंध येत असतो. परवा माझ्याकडे कामाला येणारी बाई म्हणाली " मला उद्या पासून यायला नाही जमणार घरचे म्हणाले डॉक्टरांकडे काम करण्यात धोका आहे " मी घाबरून विचारले कसला, ती म्हणाली "कोरोनाचा " तिच्या घरच्यांचे म्हणणे चुकीचे नाही परंतु ती खूप वर्षांपासून कामाला येते माझ्या दवाखान्यात टी बी, फ्लू , स्वाईन फ्लू चे पेशंट येतात व ते हि आजार असेच पसरतात पण तिला व तिच्या घरच्यांना शंका आली नाही पण कोरोनाने कमाल केली सगळ्यांचे डोळे उघडले. आता याच्या पुढे जाऊन आपण आपल्या घरात डोकावून पाहू. मी दवाखान्यात असतो सध्या कोरोनाची साथ चालू आहे. कोणता रुग्ण येऊन कोरोनाचा प्रसाद देऊन जाईल हे सांगता येत नाही, परंतु समाजाचं आपण देण लागतो या भावनेतून काम चालू आहे. जेंव्हा मी दवाखान्यातून घरी येतो. घरात पाऊल ठेवताच सर्व मला लांबूनच सूचना देतात. तुमचे कपडे तिकडे dettol मध्ये भिजत घाला, कपडे बाथरूम मध्येच आहेत अंघोळ करूनच आत या. घरात येताच आजू बाजूला मुलांचा वावर संपलाय त्यांना हि बाबा बद्दल शंका यायला लागलीय. बर मी अंघोळ करून कपडे बदलून तयार झालो तरी हि मंडळी मला टाळण्याचा प्रयत्न करतात असे आता एवढ्यात मला जाणवायला लागलंय. मी घरात येऊन मोबाईल खाली टेकायच्या आधी मुलं त्याचा ताबा घ्यायची पण आता मात्र मोबाईल वर हि ती शंका घेतात. कोरोना बापडा आज ना उद्या जाईल हि परंतु हे सगळ्यांच्या मानगुटीवर बसलेलं शंकेचं भूत कधी उतरेल कि नाही याचीच मला शंका यायला लागलीय. धन्यवाद ! डॉ. प्रविण चाळक


Corona Vs Flue symptoms

Whole world lockdown except Japan


32 views0 comments

Recent Posts

See All