- Pravin Chalak
PILES TREATMENT
Piles meaning, Piles treatment – NO MORE PILES
NO MORE PILES
मुळव्याध समज आणि गैरसमज – Piles meaning and myth मुळव्याध (piles ) म्हणजे अवघड जागेचे दुखणे असाच उल्लेख केला जातो. मी नेहमी निरीक्षण करतो तेंव्हा असे लक्षात येते ज्या व्यक्तीला गुद प्रदेशी काही आजार असेल तर तो बोलत नाही लपवून ठेवतो, इतरांना सांगायला लाजतो. त्यामुळे तो लवकर डॉक्टरांकडे जात नाही परिणाम स्वरूप त्याच्या आजारात वाढ होते. दुसरा भाग असा आहे कि गुदप्रदेशी वेदना झाल्या म्हणजे मुळव्याध झाले असा गैरसमज आपल्या समाजात दिसून येतो. गुदभागी दुखणे हे लक्षण फिशर, भगंदर, छोटासा गळू यामुळे हि होतात. मूळ मुद्दा असा आहे कि ती जागा स्वतःला दिसत नाही व दुसरे कुणाला दाखवण्याची लाज वाटते त्यामुळे त्या जागी काय झाले आहे हे लक्षात येते नाही. पूर्वी पेक्षा मुळव्याध या आजाराचे प्रमाण खूप वाढत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे बदलती जीवनशैली, व्यायामाचा आभाव, जंकफूड चे वाढते प्रमाण, दिवसेंदिवस वाढत चाललं हॉटेलिंग चे प्रमाण या गोष्टींनी बिघडत चाललेली पचन क्रिया. खालेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन न होणे हेच मूळ कारण आहे.
( ज्याला क्षारसूत्र काय असते ते माहिती नसते ), कुणी रोज मलम लावायला बोलावतो, काल एक रुग्ण toothpaste लावून आला होता पूर्ण गुदभाग त्वचा भाजून निघते तसा काळा झाला होता त्यावर असंख्य चिरा पडल्या होत्या काय म्हणावं भारतीय जनतेला. एवढं सगळे करतील पण डॉक्टर कडे जाणार नाहीत कारण गैरसमज असा आहे कि डॉक्टर लगेच ऑपरेशन सांगणार आणि दुसरा गैरसमज असा कि ऑपरेशन केले तरी मुळव्याध पुन्हा होते हे अर्ध सत्य आहे कारण ऑपरेशन नंतर डॉक्टर काही पथ्य सांगतात जे रुग्ण ती पथ्य सांभाळतात त्यांना पुन्हा त्रास होत नाही जे रुग्ण पथ्य सांभाळत नाहीत त्यांना त्रास होऊ शकतो. या सगळ्या प्रकारामुळे अगदीच त्रास सहन झाला नाही तर मग डॉक्टर कडे रुग्ण येतो व उशीर झाल्याने ऑपरेशन शिवाय पर्याय उरत नाही. म्हणूनच मुळव्याध व तत्सम आजारांची माहित सर्वसामान्य मराठी माणसाला समजावी याकरिता हा ब्लॉग चालू करीत आहे पुढील पोस्ट मध्ये प्रत्येक आजार आपण समजून घेऊ
धन्यवाद
क्रमशः
डॉ. प्रविण चाळक, मुळव्याध व भगंदरतज्ञ, BAMS, Fellowship In Ksharsutra Chikitsa,
ममता मुळव्याध क्लिनिक,
आळेफाटा, पिंपळवंडी
9860240972, htpps://www.mamatapileclinic.com/no more pilePile myth video**offer of month